राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

May 27, 2013 9:44 AM0 commentsViews: 14

कोल्हापूर 27 मे :इथं चंदगड तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. एव्हीएच कंपनी हटवण्यात यावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं पण जिल्हाधिकारी त्यांना भेटले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी कार्यालयाचं गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली.

चंदगडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्यानं तणाव निर्माण झाला होता. एव्हीएच कंपनीमुळे चंदगड तालुक्यातल्या पर्यावरणाचा र्‍हास होणार असून कंपनीत तयार होणार्‍या कोल टार गॅसमुळे मानवी शरीरावरही विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे एव्हीएच कंपनी हटवण्याची मागणी होतेय.

close