टोल विरोधात कोल्हापुरात कडकडीत बंद

May 27, 2013 9:51 AM0 commentsViews: 5

कोल्हापूर 27 मे : टोलविरोधी कृती समितीनं आज कोल्हापूर बंदची हाक दिलीय. या हाकेला कोल्हापूरकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये व्यापार्‍यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहे. शहरात शनिवारी रात्री आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्याचा निषेध म्हणून सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीनं आज कोल्हापूर बंदची हाक दिली. या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी शहरातील व्यवहार आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.

close