गोंदियाला चक्रीवादळाचा तडाखा, शेतकर्‍यांचं मोठं नुकसान

May 27, 2013 10:00 AM0 commentsViews: 17

गोंदिया 27 मे : येथील तिरोडा तालुक्यातल्या सेजगाव आणि सैसपूर या दोन गावांना चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसलाय.रविवारी संध्याकाळी अचानक आलेल्या पाऊस आणि चक्रीवादळामुळे दोन्ही गावातल्या 70 हून अधिक घरांचं छत उडाली. तर 500 च्यावर शेतातली आंब्यांची आणि इतर झाडं कोसळली आहेत. या दोन गावातल्या लोकांचं मोठं नुकसान झालं असून या वादळात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

वादळाच्या तडाख्यानं या गावांतले वीजेचे खांब मोडले असून वीज पूर्णपणे खंडीत झालीय या दोन गावातल्या बेघर झालेल्या लोकांना शेजारच्या गावातल्या लोकांनी तातडीनं राहण्याची व्यवस्था केलीय. विशेष म्हणजे शासकीय अधिकारी इथं पाहणीसाठी आले असले तरी त्यांनी अद्याप पीडित लोकांना कोणतीही शासकीय मदत करू शकलेले नाहीत.

इथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोणीही जनप्रतिनिधी अजूनही आले नसल्यानं इथले गावकरी संतप्त झाले आहेत. शासनानं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे. दोन वर्षांपुर्वी तिरोडा तालुक्याला अशाच प्रकारे चक्रीवादळाटा तडाखा बसला होता.

close