नक्षली हल्ल्याचा तपास एनआयएकडे

May 27, 2013 1:00 PM0 commentsViews: 4

छत्तीसगड 27 मे : येथील बस्तर भागात शनिवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडे सोपवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. एनआयएची टीम बस्तरमध्ये पोहोचली आहे. याविषयी राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंग यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान, या हल्ल्यात ठार झालेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांचा मुलगा उमेश पटेल यांनी मात्र, या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली. उमेश यांचा मोठा भाऊ दिनेश पटेल यांचीही काल नक्षलवाद्यांनी हत्या केली. हा राजकीय कट असल्याचा आरोपही उमेश यांनी केला.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेत्यांवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात आतापर्यंत 30 जणांचे जीव गेले आहेत. त्यांच्यासाठी काँग्रेसने आज शोकसभेचे आयोजन केलं होतं. दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष सोनिया गांधी आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

close