घरकूल घोटाळा: देवकर, जैन यांच्यावर आरोप निश्चित

May 27, 2013 1:05 PM0 commentsViews: 14

जळगाव 27 मे : घरकूल घोटाळ्याप्रकरणी कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर आणि आमदार सुरेश जैन यांच्यासह 48 जणांवर दोषारोप पत्र निश्चित करण्यात आलं आहेत. कट कारस्थान करणे, महापालिकेची फसवणूक करणे, विश्वास भंग करणे यासारखे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. सुरेश जैन आज उपस्थित राहू शकले नाहीत. आजारपणामुळे आपण यापुढे खटल्याच्या सुनावणी वेळी उपस्थित राहू शकत नाही असं जैन यांनी न्यायालयाला सांगितलंय. पण या अर्जावर 29 मे रोजी सुनावणी होणार आहे

close