गावावरचं संकट टाळण्यासाठी चिमुरडीचा दिला नरबळी

May 27, 2013 1:48 PM0 commentsViews: 95

यवतमाळ 27 मे : गावातलं संकट टाळण्यासाठी सपना या सहा वर्षीय चिमुरडीचा बळी तिच्याच आजोबांनी आणि मामानं दिल्याची ह्रदयद्रावक घटना यवतमाळमध्ये घडली. गेल्या सात महिन्यांपासून ही मुलगी बेपत्ता होती. 20 मे रोजी गावातील झुडपात या मुलीचे कपडे आणि कवटी सापडली. पोलिसांनी तपासासाठी त्या मुलीच्या मामा आणि आजोबांना ताब्यात घेतलं. सुरूवातीला दोघांनीही काही सांगण्यास नकार दिला पण पोलिसांना खाक्या दाखवताच आजोबा आणि मामाने कबुली दिली. मुलीच्या मामा आणि आजोबांनीच या मुलीचा गळा कापला होता. तिथे उपस्थित मांत्रिकाने सपनाचा गळा कापताना मंत्रोच्चार केले होते. तिचं रक्त देवीवर वाहत तिथे उपस्थित इतर आठ जणांनी ते रक्त प्रसाद म्हणून प्राशन केलं होतं अशी माहिती सध्या पोलीस तपासातून पुढे येतेय.

close