सध्याचा नक्षलविरोधी कायदा अपुरा -आर.आर.पाटील

May 27, 2013 1:56 PM0 commentsViews: 25

27 मे

छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातही नक्षलग्रस्त भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आलीय. पण, नक्षलवादाशी लढण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे अपुरे आहेत. त्यामुळे नवीन कायद्यांची गरज असल्याचं म्हणत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केंद्रावरच टीका केलीय. नक्षलग्रस्त भागात विकासकामांसाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी आणि त्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलीय. गेल्या सहा महिन्यात चकमकीत 17 नक्षलवादी ठार झाले तर एक पोलीस जवान शहीद झाला अशी माहितीही त्यांनी दिली.

close