देशद्रोहीवरील बंदी उठली

January 9, 2009 10:50 AM0 commentsViews: 5

9 जानेवारी मुंबईवादग्रस्त देशद्रोही सिनेमावरील बंदी उठवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे.सामाजिक भावना भडकवणारी दृश्य या चित्रपटात आहेत त्यामुळे ह्या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी सरकारनं केली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून ही बंदी घालण्यात आल्याचं त्यावेळी सरकारनं सांगितलं होतं. कमाल खान हे देशद्रोही सिनेमाचे निर्माते आणि मुख्य अभिनेता आहेत. कमाल खान यांनी सांगितलं की, सिनेमातला कोणताही भाग न कापता सिनेमा रिलीज होणार आहे. 23 जानेवारीला हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हायकोर्टाने बंदी उठवल्यामुळे कमाल खान यांनी आनंद व्यक्त केला आहे.

close