राम जेठमलानी यांची भाजपमधून हकालपट्टी

May 28, 2013 10:05 AM0 commentsViews: 35

नवी दिल्ली 28 मे : भाजपच्या अंतर्गत विषयांवर बिनधास्तपणे टीका करणारे राम जेठमलानी यांच्यावर अखेर कारवाईची बडगा उगारण्यात आला. राम जेठमलानी यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आलं आहे. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज ही घोषणा केली. पक्षांच्या धोरणांवर जेठमलानी यांनी अनेक वेळा टीका केली होती. राम जेठमलानी हे वरिष्ठ वकील आणि राज्यसभेतले खासदार आहेत. यापूर्वी गडकरींविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

close