नागपुरात मनसेचं आंदोलन

January 9, 2009 8:55 AM0 commentsViews: 6

9 जानेवारी नागपूरप्रशांत कोरटकरदेशभरात सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. नागपुरातही 100 पेट्रोल पंप बंद आहेत. या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातल्या वाडी भागात सरकार विरोधी निदर्शनं केली. या आधी वाहतूकदारांचा संप आणि आता इंधन तुटवड्यामुळे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. याची झळ सर्वसामान्य जनतेला सोसावी लागत आहे. त्यामुळे नागपूरमध्ये मनसेतर्फे हे आंदोलन उभारलं आहे असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे.

close