‘वानखेडे’च्या प्रेसबॉक्सला बाळासाहेबांचं नाव

May 28, 2013 12:47 PM0 commentsViews: 19

मुंबई 28 मे : मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या प्रेसबॉक्सला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. आज संध्याकाळी मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीनं अध्यक्ष रवी सावंत यांना ठाकरे कुटुंबीयांशी यांसदर्भात बातचीत करण्याचे अधिकार देण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रेस बॉक्सला बाळासाहेब यांचे नाव देण्यावरुन खूप वाद झाले होते. या प्रेसबॉक्सला क्रीडा पत्रकारांचे नाव देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली होती.

close