MCAसाठी पवारांचं कमबॅक, राणेंचीही ‘बॅटिंग’ ?

May 28, 2013 2:41 PM0 commentsViews: 19

मुंबई 27 मे : बीसीसीआयमध्ये प्रचंड उलथापालथ सुरु असतानाच मुंबई क्रिकेट संघटनेतही राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा रिंगणात उतरणार असल्याचं सुत्रांनी सांगितलंय. पुढील महिन्यात एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होतं आहे. यासाठी नारायण राणे उत्सुक आहे. मुंबई क्रिकेट संघटनेत नारायण राणे यांचा शिरकाव थांबवण्यासाठीच शरद पवार यांना अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरु आहेत. शरद पवार याआधीही मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते बीसीसीआयचे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचेही अध्यक्ष झाले होते. त्यांच्याच कारकिर्दीत भारतात वर्ल्डकप क्रिकेटचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. शरद पवार यांचं पुन्हा क्रिकेटमध्ये सक्रीय होण्यानं राष्ट्रीय पातळीवर एन. श्रीनिवासन यांच्यासमोरील समस्या वाढल्या आहेत.

बीसीसीआयमध्ये आपले अध्यक्षपद वाचवण्यासाठी एन श्रीनिवासन यांची धावपळ सुरु असतानाच आणखीन एका विरोधकाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत शरद पवार अध्यक्षपदासाठी उभे राहणार आहेत. पवार स्वत: यावर भाष्य करत नसले तरी त्यांच्या समर्थकांनी मात्र जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय.शरद पवार मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी आल्यास श्रीनिवासन यांच्या विरोधाला बळकटी मिळेल असं म्हटलं जातंय. पण त्याचबरोबर मुंबई क्रिकेट संघटनेत शिरकाव करू पाहणार्‍या नारायण राणे आणि उद्धव ठाकरे समर्थकांनाही त्यामुळे चाप बसणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार यांना भारताचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांचे आव्हान असेल.

मुंबई क्रिकेट संघटनेला एकूण 329 क्लब संलग्न आहेत. ज्यांना मतदानाचा हक्क आहे. 2001 मध्ये शरद पवार 185 मतांनी निवडून आले होते. आणि यंदाही त्यांना तितकाच पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी दिलीप वेंगसरकर यांचा 47 मतांनी पराभव केला होता. वेंगसरकर यांना 135 मते पडली होती.शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटर्स विरुद्ध राजकीय नेते अशी लढत मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेला 329 क्लब संलग्न2001 निवडणूक शरद पवार 185 मतांनी विजयीगेल्या निवडणुकीत विलासराव देशमुख विजयी

विलासराव देशमुख यांनी दिलीप वेंगसकर यांचा 47 मतांनी केला पराभव

close