रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी केली आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड

May 28, 2013 2:59 PM0 commentsViews: 26

सांगली 28 मे : मागासवर्गीयांच्या घरकुल योजना राबविण्यास महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा निषेध करीत आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर हल्लाबोल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड करीत तेथील साहित्यांची नासधूस केली.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे पालिकेत एकच पळापळ झाली. मागासवर्गीयांच्या घरकुल योजनेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होतंय याचा जाब विचारण्यासाठी आरपीआयचे कार्येकर्ते महापालिकाआयुक्त संजय देगावकर यांना भेटायला आली होती. मात्र आयुक्त व्यापार्‍यांच्या बैठकीत व्यस्त असल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आरपीआय कार्यकर्त्यांनी ही जोरदार घोषणाबाजी करत तोडफोडीला सुरवात केली. यावेळी आयुक्त कार्यालयाचे दरवाजे तोडून काचाही फोडण्यात आल्या तसेच कार्यालयातील अन्य साहित्यांचीही कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. यावेळी तेथे तैनात पोलिसांनाही धक्काबुक्की झाली. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी 15 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

close