26/11 चा कट पाकमध्ये शिजला

January 9, 2009 2:24 PM0 commentsViews: 2

9 जानेवारीमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात आखण्यात आल्याच रिचर्ड बाउचर यांनी सांगितल आहे . रिचर्ड बाउचर हे अमेरिकेचे दक्षिण आशियातील असिस्टन्ट सेक्रेटरी आहेत. ते 26/11 च्या हल्ल्याची माहिती घेण्यासाठी मुंबईत आले होते. कसाब हा पाकिस्तानी असल्याच आम्हाला माहिती नसल्याच बाउचर यांनी सांगितल. 26/11 च्या हल्ल्यामागील गटांना शोधू काढू असंही रिचर्ड बाउचर यांनी स्पष्ट केल. आम्ही अतिरेकी कारवाया करणार्‍यांच्या मुळाशी जाउन त्याचा तपास करु असही बाउचर म्हणाले. 26/11 तील सहभागी दहशतवाद्यांना पाकिस्तानचा आश्रय असल्याचे पुरावे भारतानं याआधीच अमेरिकेकडे सोपवले आहेत. पाकिस्ताननं मात्र हे वारंवार नाकारलं आहे. कसाब पाकिस्तानी नागरिक असल्याचं स्वीकारणार्‍या पाकिस्तानचे माजी सुरक्षा सल्लागार दुराणी यांना पदावरून हटवण्यात आलं होतं. त्या पाश्‍र्वभूमीवर बाउचर यांच्या विधानाने पाकिस्तानवरचा दबाव वाढला आहे.

close