मय्यप्पनच्या पोलीस कोठडीत 31 मे पर्यंत वाढ

May 29, 2013 9:45 AM0 commentsViews: 25

मुंबई 29 मे : स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेला चेन्नई सुपर किंग्जचा पदाधिकारी गुरुनाथ मयप्पनच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. त्याची पोलीस कोठडी आता 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचा मित्र विक्रम अग्रवाल अजून सापडलेला नाही. त्यालाही समन्स बजावण्यात आलंय. शिवाय विंदू आणि मयप्पन यांचं बोलणंही रेकॉर्ड करण्यात आलंय. त्यात अनेकांची नावं आली आहेत. ती नावं कोड भाषेत आहेत. त्याचा अजून उलगडा व्हायचा आहे. यापूर्वी मयप्पनकडून 3 मोबाईल, पाच सीमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. तसंच आयपीएल संदर्भातली माहिती असलेली एक डायरीही सापडली आहे.

close