होय, श्रीसंतला बुकीसोबत भेटलो होतो -विंदू

May 29, 2013 9:51 AM0 commentsViews: 11

मुंबई 29 मे : आपण एस. श्रीसंतला भेटल्याची कबुली अभिनेता विंदू दारा सिंगने मुंबई पोलिसांना दिल्याची माहिती मिळतेय. 14 मे रोजी विंदूच्या जुहूमधल्या घरी ही भेट झाली होती. या भेटीचा उद्देश मात्र समजू शकला नाही. विशेष म्हणजे, स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला सट्टेबाज पवन जयपूर हाही यावेळी उपस्थित होता. पवन आणि संजय जयपूरच्या संपर्कात असल्याची माहिती विंदूनं दिली आहे. त्याच्या घरातून या दोघांचे मोबाईल फोनही मुंबई पोलिसांनी जप्त केलेत. या दोघांना पळून जाण्यात विंदूनं मदत केली. या भेटीनंतर दोनच दिवसांनी म्हणजे 16 मे रोजी श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

close