राहुल गांधींचा दुष्काळी दौरा म्हणजे निव्वळ नाटक -मुंडे

May 29, 2013 10:05 AM0 commentsViews: 8

बीड 29 मे : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा दुष्काळी दौरा म्हणजे नुसते नाटक असून यातून फार काही साध्य होणार नाही अशी थेट टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. काँग्रेसला दुष्काळग्रस्तांबाबत काही वाटत असेल तर त्यांनी तात्काळ पाच हजार कोटी रुपयांची मदत द्यावी असंही मुंडेंनी म्हटलंय. बीडमधल्या गेवराई तालुक्यातल्या तलवाडा इथं श्रमदानातून गाळ काढण्यात आला. त्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंगळवारी राहुल गांधी यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री इथं चारा छावणींची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी केंद्राकडून संपूर्ण मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं होतं.

close