तेल कंपन्यांचा संप मिटला

January 9, 2009 2:27 PM0 commentsViews: 3

9 जानेवारीगेले दोन दिवस चालू असलेला सरकारी तेल कंपन्यांमधील कर्मचार्‍यांचा संप अखेर मिटला आहे. वेतनश्रेणीत वाढ व्हावी या मागणीसाठी हा संप सुरू होता. मात्र सरकारनं कठोर भूमिका घेत कर्मचार्‍यांवर एस्माचा बडगा उभारला होता. विनाअट संप मागे घेतल्याने हे सरकारचं मोठं यश मानलं जात आहे.भारत पेट्रोलियम आणि ऑईल इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्यांचा संप आधीच मागे घेतला होता. बीपीसीएलचेही अधिकारी कामावर रूजू झाले होते. हिंदुस्तान पेट्रोलियमचे कर्मचारी या संपात सहभागी झालेले नव्हते. त्यामुळे या कंपनीचं काम सुरूच आहे. इंडियन ऑईल आणि ओएनजीसीतील कर्मचारी मात्र शेवटपर्यंत संप मागे घेण्यास तयार नव्हते. इंडियन ऑईलमधील 64 कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं. मात्र अखेरीस या दोन्ही कंपन्यांनी माघार घेतली.लोकांनी घाबरून पेट्रोलचे मोठ्या प्रमाणावर साठे केले आहेत. त्यामुळे पेट्रोलचा तुटवडा वाढला होता. मात्र आता तेल कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनी शनिवार रविवारीही पूर्ण वेळ काम करायची तयारी दाखवल्यानं सोमवारपर्यंत परिस्थिती सर्वसामान्य होण्याची अपेक्षा आहे. मात्र ज्या मालवाहतूकदारांच्या गाड्यांच्या पेट्रोलच्या वितरणासाठी वापर करण्यात येतो, ते ही संपावर असल्याने वितरणात अडथळे येण्याची शक्यता आहे.पेट्रोलच्या तुटवड्याची झऴ बसू लागली, तसा नागरिकांमधला संतापही वाढत चालला होता. त्यामुळेच मुंबईतल्या चालू असलेल्या मोजक्या पेट्रोलपंपांपैकी काही पंपांवर काहीही अनुचित घडू नये म्हणून अक्षरशः पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याची वेळ आली होती. या बंदोबस्तातच पेट्रोलवाटप करण्याची वेळ पोलिसांवर आली होती.

close