फीवाढीविरोधात पालकांचा ‘आवाज’, मुलांची शाळेतून हकालपट्टी

May 29, 2013 1:52 PM0 commentsViews: 4

नाशिक 29 मे: येथील रासबिहारी इंटरनॅशनल शाळेनं अनेक विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय. पालकांनी शाळेच्या बेकायदा फीवाढीविरोधात आवाज उठवला म्हणूनही कारवाई करण्यात आल्याचं पुढे आलंय. त्यांच्या घरी विद्यार्थ्यांची लिव्हींग सर्टीफिकेट्स पाठवण्यात आलीत.

त्याविरोधात पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण आतापर्यंत सहा वेळा धरणे आंदोलनं आणि दोनवेळा विद्यार्थ्यांसह मोर्चे काढूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. शाळा उघडण्याची तारीख दोन दिवसांवर आली आहे पण शिक्षण अधिकारी एकमेकांच्या कोर्टात जबाबदारीचे चेंडू फेकत आहेत. मात्र फी न भरल्यामुळे मुलांना शाळेतून काढून टाकल्याचं शाळा व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.

close