लाचखोर चिखलीकरच्या जामिनावर उद्या निर्णय

May 29, 2013 1:58 PM0 commentsViews: 8

नाशिक 29 मे : सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाचखोर इंजिनिअर सतीश चिखलीकर यांच्या जामीन अर्जावर आज नाशिक कोर्टात सुनावणी झाली असून न्यायालय यावर उद्या निर्णय देणार आहे. चिखलीकर आणि वाघ यांच्या अटकेला एक महिना पूर्ण होतोय.

दरम्यान, अवैध संपत्ती जमवल्याबद्दल या दोन्ही अधिकार्‍यांच्या विरोधात आणि त्यांच्या पत्नींच्या विरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिखलीकर आणि वाघ यांच्या पगाराचं उत्पन्न आणि त्यांच्याकडे सापडलेली अवैध संपत्ती याचा ताळमेळ जुळत नसल्यानं त्यांच्या विरोधात नव्यानं गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही अवैध संपत्ती जमवण्यात आणि लपवण्यात त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग दिसत असल्याने या दोघांच्या पत्नींनाही जबाबदार धरण्यात आले आहे. त्यामुळे उद्या चिखलीकरांच्या जामीन अर्जावर काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close