इशरत जहां प्रकरणी वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात

May 29, 2013 5:04 PM0 commentsViews: 33

गुजरात 29 मे : इशरत जहां बनावट चकमकी प्रकरणी गुप्तचर विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. या बनावट चकमकीची एक्सक्लुझिव्ह माहिती सीएनएन आयबीएनच्या हाती लागलीय. त्यानुसार गुप्तचर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यानं खोटी माहिती पुरवली का आणि त्या माहितीच्या आधारे चकमक करण्यात आली का, याचा सीबीआय तपास करतेय. हे अधिकारी आणि गुजरातचे पोलीस अधिकारी यांच्यात संगनमत होतं का, याचाही तपास सुरू आहे. संचलाक पदाचा हा अधिकारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान, गुजरात पोलिसांच्या 6 पोलीस अधिकार्‍यांना यापूर्वी अटक करण्यात आलीय.

close