घरकूल घोटाळा: गुलाबराव देवकरांनी गुन्हे नाकारले

May 30, 2013 10:27 AM0 commentsViews: 31

जळगाव 30 मे : घरकुल घोटाळा प्रकरणी कृषीराज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी गुन्हे नाकारले आहेत. या प्रकरणी जळगाव कोर्टात सुनावणी सुरु आहे. गुलाबराव देवकरांसह या खटल्यातल्या 51 आरोपींनीही गुन्हे नाकारलेत. आज जळगाव कोर्टात गुन्ह्यांचं वाचन झालं. यासंबंधी पुढची सुनावणी 13 जूनला होणार आहे. याच खटल्यातले दुसरे महत्त्वाचे आरोपी सुरेश जैन यांची सुनावणी थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा होणार आहे. जैन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. तिथूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची सुनावणी होईल.

ठळक मुद्देगुलाबराव देवकरांनी कोर्टात गुन्हा नाकारला -51 आरोपींनीही आपले गुन्हे नाकारले-न्यायालयात गुन्ह्यांचं झालं वाचन,-पुढची सुनावणी 13 जूनला.-सुरेश जैन यांच्यासोबत होणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीदेवकर दोषी आढळल्यास कारवाई करणार – अजित पवार

दोषी आढळलेल्या सर्व मंत्र्यांवर कारवाई करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. विजयकुमार गावित आणि गुलाबराव देवकर यांच्याविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

close