दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचं निधन

May 30, 2013 10:49 AM0 commentsViews: 15

कोलकाता 30 मे : प्रसिध्द बंगाली चित्रपट दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 50 वर्षांचे होते. अनेक उत्तमोत्तम, आशयघन चित्रपट निर्माण करणारे दिग्दर्शक म्हणून ऋतुपर्णो घोष यांची ओळख होती. 'रेनकोट', 'चमोखेर बाली', 'उनीशे एप्रिल' अशा अनेक उत्तमोत्तम चित्रपटांसाठी ऋतुपर्णो ओळखले जातात. 'अबोहोमन' या बंगाली चित्रपटासाठी त्यांना बेस्ट डायरेक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ऋतुपर्णो यांच्या निधनामुळे बॉलिवडूच्या अभिनेत्यांनी दुख व्यक्त केलंय.

close