अंकित चव्हाणला लग्नासाठी जामीन मंजूर

May 30, 2013 12:02 PM0 commentsViews: 35

मुंबई 30 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला क्रिकेटपटू अंकित चव्हाण याला आज कोर्टाने जामीन मंजूर केला. अंकितचं मुंबईत येत्या 2 जून रोजी लग्न होणार आहे. यासाठी त्यानं सत्र न्यायालायत जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. लग्नाची तयारी पूर्ण झाली असून लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या आहे. त्यामुळे जामीन मिळावा, असं त्यानं म्हटलं होतं. या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. अंकितला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. पण 6 जून रोजी अंकितला पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी राजस्थान रॉयल्सकडून खेळणार्‍या अंकित चव्हाणसह एस श्रीसंत आणि अजित चंडिलाला 16 मे रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती.

close