‘चेन्नई’साठी पवारांचीच श्रीनिवासन यांना मदत

May 30, 2013 12:16 PM0 commentsViews: 37

नवी दिल्ली 30 मे : माझ्या हाती सूत्र असती तर मी ही परिस्थिती येऊच दिली नसती अशा कठोर शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यावर टीका केली. पण, याच शरद पवारांनी 2008 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष असताना श्रीनिवासन यांना चेन्नईची टीम खरेदी करण्यासाठी मदत केली होती. सीएनएन आयबीएनच्या हाती यासंबंधीची कागदपत्रं लागली आहेत. पवारांनीच इंडिया सिमेंटला आयपीएलची टीम मिळवून देण्यासाठी मंजुरी दिली होती. आणि त्यासाठी बीसीसीआयच्या घटनेतही बदल करण्यात आला. या बदलानंतरच श्रीनिवासन लिलावामध्ये सहभागी होऊ शकले आणि त्यांनी टीम विकत घेतली.

बीसीसीआयच्या नियमांमध्ये काय बदल करण्यात आले ?

कलम 6.2.4 (सुधारणेपूर्वी)- या कलमानुसार बोर्डाचा प्रशासक बोर्डाने आयोजित केलेल्या मॅच आणि कार्यक्रमांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष व्यावसायिक लाभ घेऊ शकत नाही. – कलम 6.2.4 (सुधारणेनंतर)आयपीएल, चॅम्पियन्स लीग आणि T-20 वगळता बोर्डान् आयोजित केलेल्या मॅच आणि कार्यक्रमांचा प्रशासक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ घेऊ शकत नाही

महत्त्वाचे सवाल- खुद्द शरद पवारांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का ?- शरद पवारांमुळेच श्रीनिवासन यांना IPL टीम खरेदी करता आली का ?- IPL वादासाठी एकट्या श्रीनिवासन यांनाच जबाबदार धरावं का ?- शरद पवारांनी जबाबदारी स्वीकारतील का ?श्रीनिवासन यांच्यावर राजीनामा देण्यास वाढता दबाव

दरम्यान, एन श्रीनिवासन यांच्यावर अध्यक्षपदावरुन राजीनामा देण्याचा दबाव वाढत चाललाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार बीसीसीआयमधले 18 सदस्य श्रीनिवास यांच्या विरोधात आहेत, तर श्रीनिवासन यांच्यासह फक्त 7 सदस्यांचा श्रीनिवास यांना पाठिंबा आहे.

दरम्यान, गोवा आणि आसाम क्रिकेट बोर्डांनीही श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीय. फिक्सिंगप्रकरणाची चौकशी सुरु असेपर्यंत श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदावर राहू नये, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. याआधी आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अरुण जेटली यांच्यासह अनेकांनी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

close