‘सत्यम’ वर लवकरच कारवाई

January 9, 2009 2:37 PM0 commentsViews: 2

9 जानेवारी, हैदराबाद सत्यम महाघोटाळ्याबाबत सरकार लवकरच कडक कारवाई करणारेय. कंपनीचं काम सुरळीत रहावं यासाठी अंतरीम बोर्ड बनवण्याच्या विचारात सरकार आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज' नंही सत्यमच्या सर्व खात्यांवर जप्ती आणलीय. सेबीची टीमही सत्यमच्या हैदराबादच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दाखल झालीय. त्यांनी "सत्यम सिटी सेंटर" या सत्यमच्या जुन्या कार्यालयातून काही महत्वाचे ङॉक्युमेंट्सही जप्त केलेत. सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशनचे अधिकारीही हैदराबादमध्ये पोचलेत. दरम्यान राजू हे त्यांच्या कोमपल्लीच्या गेस्ट हाऊसवर असून 10 जानेवारीच्या बोर्ड मीटिंगनंतर त्यांना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सेबीनंदेखील सत्यमचे अध्यक्ष रामलिंग राजू यांना समन्स बजावलं आहे. राजू हे उद्या संध्याकाळी चार वाजता सेबीच्या ऑफिसात हजर होतील अशी बातमी सूत्रांकडून मिळालीय. तोपर्यंत त्यांच्या वतीनं आपण स्वत: हजर राहणार असल्याचं त्यांच्या वकिलांनी आज हैद्राबादमध्ये सांगितलं.

close