नयना पुजारी हत्याप्रकरणी अखेर मुख्य आरोपी अटकेत

May 31, 2013 7:47 AM0 commentsViews: 247

पुणे 31 मे : पुण्यातल्या गाजलेल्या नयना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणातील फरार प्रमुख आरोपी योगेश राऊतला अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी योगेशला अटक केली. गेल्या वर्षभरापासून योगेश फरार होता.

नयना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणात पहिल्यांदा अटक केल्यानंतर तब्येत बिघडल्याच्या कारणावरून योगेशला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. आणि तिथून तो फरार झाला होता. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी नयना पुजारी 7 ऑक्टोबर 2009 मध्ये बेपत्ता झाली होती. त्यानंतर 9 तारखेला तिचा मृतदेह खेड परिसरात सापडला होता.

त्यावेळी तिचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. तिच्या पर्समधून ATM कार्ड चोरीला गेलं होतं. त्या कार्डावर 45 हजार रुपये काढून घेतलं होतं. याप्रकरणी एसआयटीची सुध्दा स्थापनाही करण्यात आली होती. अखेर वर्षभरापासून फरार असलेला योगेश काल पोलिसांच्या ताब्यात आला.

close