लाचखोर चिखलीकर आणि वाघला जामीन मंजूर

May 31, 2013 10:27 AM0 commentsViews: 50

नाशिक 31 मे : सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ या दोघांनाही प्रत्येकी 50 लाख रुपयाचा जातमुचलक्यावर नाशिक सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल एक महिन्यानंतर दोघांना बाहेर येण्याची संधी निर्माण झालेली असली तरी एवढ्या मोठ्या रकमेचा जामीन मिळवण्यासाठी दोघांच्याही कुंटुबिंयांची धावपळ सुरु आहे.

हा जामीन देतांना न्यायालयाने त्यांच्यावर काही अटी घातल्या आहेत. पहिली अटी म्हणजे पुढल्या आठवड्यात दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच यावेळेत दररोज अँटी करप्शनच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणे आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात आठवड्यातून दोनदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाचखोर प्रकरणी चिखलीकर आणि वाघ यांच्याकडून कोट्यावधींची संपत्ती हस्तगत करण्यात आली आहे.

प्रकरण कसे उघड झाले ?

30 एप्रिल रोजी चिखलीकरच्या घरात तब्बल 2 कोटी 96 लाखांची रोकड सापडली होती. 22 हजारांच्या लाचखोरी प्रकरणात अधिक तपासणी करत असताना एवढं मोठं घबाड अँटी करप्शन ब्युरोच्या हाती लागलं होतं. चिखलीकर आणि ब्रँच इंजिनिअर जगदीश वाघ यांना अँटी करप्शन ब्युरोनं लाच घेताना रंगेहात पकडलं.

त्र्यंबकेश्वरमधल्या रस्त्याचं बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडून 6 टक्के लाच मागितली होती. त्याचे 22 हजार घेताना त्यांना अटक करण्यात आलं. या प्रकरणाचा तपास करताना चिखलीकर यांच्या गुलमोहर या सरकारी बंगल्यातून तब्बल 2 कोटी 96 लाखांची रक्कम अँटी करप्शन ब्युरोला मिळाली.

तर जगदीश वाघ यांच्या घरातून 35 हजार रुपये मिळाले होते. तसंच 11 तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि मोठ्या मालमत्तांची कागदपत्रंही या दोघांच्या घरातून मिळाली आहेत. लाचलुचपत खात्याकडून झाडाझडती अजूनही सुरू आहे. या दरम्यान, चिखलीकरच्या लॉकरमध्ये तब्बल चार किलो सोनं सापडलं होतं.

चिखलीकराची मालमत्ताजिथे पोस्टींग तिथे प्रॉपर्टी… हे सूत्र आहे, कोट्यावधीची माया जमवणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या करोडपती होण्याचं…17 वर्षांच्या सेवेत त्यांनी 14 कोटींची माया जमवली. त्याशिवाय त्यांच्या मालमत्तेची किंमत बर्‍याच कोटींनी पुढे जातेय. 6 टक्के कमीशन द्या आणि बीलं काढून घ्या. फक्त एकच तत्व. याच तत्त्वाच्या आधारावर त्यांनी कोट्यावधींची प्रॉपर्टी केली.

लाचखोर अधिकार्‍यांनी बेनामी संपत्तीवर

- कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांची मालमत्तारोकड – 7 कोटी 46 लाखसोने, चांदी – 4 किलो 50 तोळेमालमत्ता – कल्याण, ठाणे येथे दोन बिअरबार, एक पेट्रोलपंप, औरंगाबाद, लातूर, जालना, मुंबई येथे मालमत्ता

शाखा अभियंता जगदिश वाघ यांची मालमत्तारोकड – 47 लाखसोने – 1 किलो मालमत्ता – नाशिकमध्ये दोन फ्लॅट आणि धुळ्यात फ्लॅट

चिखलीकरची नाशिकबाहेरची नव्याने पुढे आलेली मालमत्ता

1) वाशीत दुकानकिंमत – 68 लाखठिकाण- 17, प्लाझा, सेक्टर 19 डीक्षेत्रफळ – 681 चौरस फूट

2) बाणेरमध्ये प्लॉटकिंमत – 23 लाखठिकाण- सर्व्हे नं. 114, बाणेरक्षेत्रफळ – 491 चौरस मीटर

3) बालेवाडीत प्लॉट किंमत – 16 लाखक्षेत्रफळ – 600 चौरस मीटर

4) कोथरूडमध्ये प्लॉटकिंमत – 37 लाखठिकाण- प्लॉट नं. 8, सर्व्हे नं. 78क्षेत्रफळ – 451 चौरस मीटर

5) लोणी काळभोर येथे शेतजमीनकिंमत – 3 लाखक्षेत्रपळ – 4 आर

6) औरंगाबादमध्ये प्लॉटकिंमत – 39 लाखठिकाण- मुकुंदवाडीक्षेत्रफळ – 8 हेक्टर7) औरंगाबाद वाळूंज एमआयडीसीत अभी इंजिनिअरिंग फॅक्टरीठिकाण- 68 लाखक्षेत्रफळ – 16 हजार चौरस मीटरदोन गाळे क्षेत्रफळ – 1600 चौरस मीटर

close