नक्षली हल्ल्याची होणार न्यायालयीन चौकशी

May 31, 2013 1:18 PM0 commentsViews: 7

छत्तीसगड 31 मे : बस्तरमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी सर्व राज्यांनी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर ग्रीनहंट टीमची स्थापना करावी अशा सुचना शिंदे यांनी केली आहे. गेल्या शनिवारी बस्तर इथं नक्षलवाद्यांचा हल्ल्यात काँग्रेस नेत्यांसह 24 जण ठार झाले होते. या घटनेची सर्व माहिती घेण्यासाठी शिंदे यांनी आज बस्तर इथं भेट दिली. नक्षल हल्ल्यात इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे की नाही हे रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल असंही शिंदे यांनी म्हटलंय.

close