जगमोहन दालमिया BCCIचे अंतरिम अध्यक्ष

June 2, 2013 11:34 AM0 commentsViews: 22

02 जून : बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष म्हणून जगमोहन दालमिया यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. नाट्यपूर्ण ठरलेल्या बीसीसीसीआयच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत दालमिया यांच्या नावाचा ठराव झाला. अरुण जेटली यांनी दालमियांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. दालमिया हे सप्टेंबरपर्यंत अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. सध्या दालमिया हे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पण दुसरीकडे एन श्रीनिवासन यांनी मात्र अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, तर फिक्सिंग प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पदापासून दूर राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

श्रीनिवासन यांचं स्पष्टीकरण- अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही, पदापासून दूर राहणार- जावयाच्या चुकीची शिक्षा मला का?- फिक्सिंग प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पदापासून दूर राहणारजगमोहन दालमिया यांची कारकीर्द

- आयसीसीचे माजी अध्यक्ष (1997 ते 2000)- बीसीसीआयचे माजी अध्यक्ष – बीसीसीआयचे माजी खजिनदार – 2006 साली दालमियांवर भ्रष्टाचाराचे आरोप- 2006 साली बीसीसीआयमधून हकालपट्टी- 2007 साली पुन्हा एकदा CAB चे अध्यक्ष

close