न्यायाधिशांमध्ये जुंपली

January 9, 2009 4:23 PM0 commentsViews: 1

9 जानेवारी, चंदीगडआरोप आणि प्रत्यारोप ही राजकारणातली रोजचीच बाब असली. तरी न्यायव्यवस्थेत अशा घटना क्वचितच घडतात. पण मंगळवारी चंदिगडमधल्या एका न्यायाधीशाने दुस-या न्यायाधीशाच्या चारित्र्यावर संशय घेतल्याची घटना घडली आहे.पंजाब आणि हरियाणा हायकोर्टातल्या न्यायमूर्ती निर्मल यादव यांना लाच घेतल्या प्रकरणी भारताच्या सरन्यायाधीशांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला उत्तर देताना न्यायमूर्ती यादव यांनी म्हटलंय की सुप्रीम कोर्टातल्या एका न्यायाधीशाने जाणून बुजून मला या प्रकरणात अडकवलंय. नोटिशीला उत्तर देताना न्यायमूर्ती यादव पुढे म्हणाले की सुप्रीम कोर्टातल्या या न्यायाधीशाचे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टातल्या न्यायमूर्ती निर्मलजित कौर यांच्याशी संबंध आहेत. आणि निर्मलजित कौर यांना वाचवण्यासाठी त्यांनी मला या प्रकरणात गोवलं आहे. या प्रकारानं न्यायाधिशांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

close