आसाममध्ये बॉम्बस्फोट

January 9, 2009 4:27 PM0 commentsViews: 1

9 जानेवारी, गुवाहाटीआसाममधल्या गुवाहाटीमध्ये संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला. त्यात 3 जण ठार तर 6 जण जखमी झाले. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. गुवाहाटीमधल्या मालेगाव भागात कामाख्य मंदिरासमोर हा स्फोट झाला. प्राथमिक तपासात एका सायकलवर ही स्फोटकं ठेवल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी उल्फा बंडखोरांवर संशय व्यक्त केलाय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गुवाहाटीमध्ये 3 बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 3 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी झाले होते. त्यानंतर गुवाहाटी पुन्हा एकदा अतिरेक्यांचं लक्ष ठरली.

close