वैफल्यग्रस्तातून नक्षलवाद्यांची धमकी -गृहमंत्री

June 2, 2013 5:09 PM0 commentsViews: 22

नांदेड 02 जुन : नेहमीच चित्र बघितलं तर नक्षलवादी पुढे आणि पोलीस मागे हे स्पष्ट झालं आहे. त्यांच्या मनात नेत्यांबद्दल राग आहे. यापुर्वीहीे गृहमंत्र्यांवर हल्ले झाले आहेत नक्षलवादी वैफल्यग्रस्त असल्यानं अशा धमक्या देत आहे अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर.आऱ पाटील दिली. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात काँग्रेस नेते महेंद्र कर्मा यांची हत्या करण्यात आली होती तर 29 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी नक्षवादी संघटनेनं घेतली त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांसह आर.आर.पाटील यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

close