हॉस्पिटलमध्ये बाळं पळवण्याचं रॅकेट

January 9, 2009 4:32 PM0 commentsViews: 2

9 जानेवारी, मुंबईअलका धुपकरकाही दिवसांपूर्वी वसईमध्येही डॉक्टरांनी आपल्या बाळाला विकल्याचा आरोप नेहा गावकर या महिलेंनं केला होता. याप्रकरणी डॉक्टर आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आता या घटनांमागे एखादी टोळी कार्यरत आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.निलेश आणि नेहा गावकर यांच्यावर आपल्या नवजात अर्भकाला गमावण्याची वेळ आली होती. अनुराधा हॉस्पिटलच्या डॉ. हरिवदन आणि अंकुर भन्साळी यांनी आपलं बाळ विकल्याचा आरोप गावकर यांनी केला होता. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या दोघांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलीस आता प्रयत्नशील आहेत. त्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. यामागे एखादी टोळीच कार्यरत असण्याचा संशय पोलिसांना आहे.कदाचित लवकरच अशी टोळी पकडली जाईल. कदाचित याबद्दल मीडियातून भरपूर चर्चाही होईल. या सगळ्याला चांगलीच प्रसिद्धीही मिळेल. मात्र आपल्या बाळाला गमावण्याची वेळ आलेल्या या दाम्पत्याला गरज आहे ती भक्कम आधाराची.

close