बेस्ट मुंबईकरांसाठी धावली

January 9, 2009 4:36 PM0 commentsViews: 1

9 जानेवारी मुंबईतेल कंपन्यांच्या संपामुळे दिवसभर मुंबईकरांचे मोठे हाल झाले. पण बेस्ट नेहमीप्रमाणेच प्रवाशांच्या मदतीला धावून आली. रिक्षा आणि टॅक्सी बंद असताना बेस्टच्या 4000 बसेसनी मुंबईकरांची गैरसोय टाळली. अनेक कंपन्यांची ऑफिसेस ते रेल्वे स्टेशन अशा बेस्टनं फे-या केल्या. एअरपोर्टवरच्या प्रवाशांनाही बेस्टनं सेवा दिली. बेस्टकडे डिझेल आणि पेट्रोलचा 6 लाख लीटरचा साठा आहे. त्यामुळे संपाचा बेस्टवर परिणाम झाला नसल्याचा दावा बेस्टचे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रोगडे यांनी केला. तसंच आज बेस्टच्या उत्पन्नात वाढ झाल्याचंही त्यांनी नमूद केलं

close