रेसकोर्सबाबत सेनेचा पोरकटपणा सुरू -नितेश राणे

June 3, 2013 1:34 PM0 commentsViews: 128

मुंबई 03 जुन : मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जमिनीचा वाद आता चांगलाच पेटलाय. या वादात आता स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी उडी घेतलीय. ज्या शिवसेनेची विश्वासार्हता संपली आहे ती शिवसेना रेसकोर्सच्या भव्य जागेवर काहीही करु शकणार नाही. यापुर्वी लंडनच्या धर्तीवर मुंबई आय, भुयारी पार्किंग,खार्‍या पाण्यापासून गोड पाणी अशा गोंडस घोषणा सेनेनं केल्या पण त्या कधीच प्रत्यक्षात आल्या नाहीत. त्यामुळे रेसकोर्सच्या जागेवर कोणतंही थीम पार्क होऊ शकणार नाही. तिथे रेसकोर्सच राहील असं नितेश राणे यांनी सांगितलं. तसंच शिवसेनेकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे रेसकोर्सबाबत हा पोरकटपणा सुरू आहे अशी बोचरी टीकाही राणे यांनी केली.

close