राज्यातले 389 पेट्रोल पंप सुरू

January 9, 2009 12:52 PM0 commentsViews: 2

9 जानेवारी दिल्लीकेंद्रीय पेट्रोलियम मुरली देवरा आणि पेट्रोलियम सेक्रेटरी आर. एस. पांडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एचपीसीएलचे काम सुरळीत चालू आहे. सरकारच्या कडक धोरणामुळे बीपीसीएलचे 70 टक्के कर्मचारी कामावर परतले आहेत. तसंच मुंबईत आयओसीचा पुरवठा व्यवस्थित चालू आहे अशी माहिती दिली. मुंबईत 138 गॅस पंप संध्याकाळपर्यंत सुरू होतं आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या 4 महानगरातले 389 पेट्रोल पंप सुरू झाले आहेत. हा संप लवकरच बंद होईल अशी आशा पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

close