तब्बल 40 क्विंटल धान्य जमिनीत पुरलं !

June 3, 2013 2:04 PM0 commentsViews: 52

हिंगोली 03 जुन : इथं पळसीमध्ये धान्य जमिनीत पुरून ठेवण्याची अजब घटना घडली. रूकमिणी शाळेच्या संस्था अध्यक्ष विजयकुमार वाठोरे यानी शासनाच्या शालेय पोषण याजनेअंतर्गत साठवलेलं तब्बल 40 क्विंटल धान्य पुरून ठेवलं होतं. मनसेच्या कार्यकर्त्यांना याचा सुगावा लागताच त्यांनी शाळेच्या मागच्या बाजूला खणायला सुरूवात केली. तेव्हा त्यांना तांदूळ, वाटाणे, मूग, मटकी, मसूर जमिनीत पुरलेलं मिळालं. यासंबंधी संस्था अध्यक्ष व इतर संबंधितांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

close