‘साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज-उद्धव यांनी एकत्र यावं’

June 3, 2013 3:16 PM0 commentsViews: 54

पंढरपूर 03 जुन : मनसेला महायुतीत घेण्यासंदर्भात आता शिवसेनेतूनच आवाज निघू लागलाय. राज आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र येऊन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करावं असं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या कदम यांनी हे वक्तव्य केलंय. मनसेला महायुतीत घेण्याविषयी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंच्या वक्तव्याचा सामना दैनिकांतून चांगलाच समाचार घेण्यात आाला होता. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता सेनेतून मनसेची जवळीक साधण्याचा आवाज येऊ लागल्यानं शिवसेना पक्ष प्रमुख काय भुमिका घेणार असा प्रश्न आहे.

close