भारताची इस्त्राएलशी तुलना नको : प्रणव मुखर्जी

January 10, 2009 6:53 AM0 commentsViews:

9 जानेवारी, दिल्लीसीएनएन आयबीएनशी खास बातचीत करताना भारताचे परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांनी पाकिस्तान बाबत सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं. इस्रायलच्या कारवाईशी तुलना करणचं मुळात चुकीचं असल्याचं ते बोलले. सीएनएन-आयबीएनचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांच्याशी त्यांनी खास बातचीत केली."सर्व पर्याय खुले आहेत.पण इस्रायलशी तुलना करणं चूक आहे,कारण आम्ही काही पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांची जमीन ताब्यात घेतली नाहीये.त्यामुळे त्यांच्याशी तुलना होऊच शकत नाही." असं ते म्हणाले

close