कात्रजमध्ये पावसाचे थैमान

June 11, 2013 12:37 PM0 commentsViews: 421

पुणे 11 जून : कात्रजजवळ मुसळधार पावसाने घातलेल्या थैमानात पुण्यातले भाजप कार्यकर्ते सचिन वाडेकर यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर त्यांची दीड वर्षांची मुलगी अजून बेपत्ता आहे. कात्रज शिंदेवाडीमधल्या अपघाताच्या घटनेला शंभर तास उलटून गेल्यावर प्रशासनाला अखेर जाग आली. पुणे – सातारा हायवेवरील अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. कात्रज बोगदा ते खेड-शिवापूर टोलनाका येथील 160 बांधकामं पाडली जाणार आहे. या कारवाईत 10 जेसीबी मशिनच्या साह्यानं 160 बांधकामं पाडण्यात येणारे आहे. यात हॉटेल्स, दुकानं, टपर्‍यांवर कारवाई होणारे दोन ते तीन दिवस ही कारवाई चालणार आहे.

close