राष्ट्रवादीचा खांदेपालट : कुठे जल्लोष तर कुठे शुकशकाट

June 11, 2013 12:46 PM0 commentsViews: 89

जळगाव 11 जून : राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळातल्या फेरबदलानंतर उत्तर महाराष्ट्रात 'कही खुशी कही गम' अशी अवस्था आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्यानं त्यांच्या अकोले मतदारसंघात जल्लोष आहे तर मंत्रीपद गमावलेल्या बबनराव पाचपुतेंच्या श्रीगोंदा मतदार संघात शुकशुकाट आहे. जळगाव जिल्ह्यातही तिच परिस्थिती आहे. सावकरेंच्या घराजवळ जल्लोष तर देवकरांच्या मतदारसंघात शांतता पसरलेली आहे. पहिल्यांदाच बार्शीला कॅबिनेट दर्जाचा मंत्री मिळाल्यामुळे शहरात उत्साहचं वातावरण आहे. 5 वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आलेल्या दिलीप सोपल हे अजित पवार आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय. तर कुठे गुलालाची उधळण करत,ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी आपला आपल्या नेत्यांच्या निवडीचा जल्लोष साजरा केला आहे. तर आष्टीचे आमदार सुरेश धस यांना मंत्रिपद मिळाल्यानं त्यांच्या मतदारसंघातही जल्लोष सुरू आहे.

close