राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा शपथविधी

June 11, 2013 5:41 PM0 commentsViews: 103

11 जून मुंबई : काही दिवसांपासून उत्सुकतेचा विषय ठरलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळात फार मोठे फेरबदल होतील ही अपेक्षा फोल ठरली आहे. प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, अजित पवारांचे खंदे समर्थक शशिकांत शिंदे आणि दिलीप सोपल यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. तर आष्टीचे सुरेश धस, भुसावळचे आमदार संजय सावकारे, आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मातब्बर मंत्र्यांना हात लावण्यात आला नाही याचा निषेध म्हणून विरोधकांनी या शपथविधीवर बहिष्कार टाकला. या मंत्र्यांना वगळलं- लक्ष्मण ढोबळे – पाणी पुरवठामंत्री- प्रकाश सोळंके – महसूल राज्यमंत्री- रामराजे नाईक निंबाळकर – कृष्णा खोरे पाटबंधारे मंत्री- बबनराव पाचपुते (आदिवासी विकास मंत्री)- भास्कर जाधव (नगर विकास राज्य मंत्री)- गुलाबराव देवकर (परिवहन राज्य मंत्री)

या नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

1. मधुकर पिचड – अकोले (प्रदेशाध्यक्ष)- कॅबिनेटपदाची शपथ- सातव्यांदा आमदार – प्रदेशाध्यक्ष – आदिवासी विकास मंत्री – युतीच्या काळात विरोधी पक्षनेते 2. शशिकांत शिंदे कोरेगाव-सातारामाथाडींचे नेते सांगली-सातार्‍यातले माथाडी हे त्यांचं बलस्थान

3. दिलीप सोपल – बार्शी बार्शीचे आमदार पाचव्यांदा आमदार पाचही वेळा नव्या चिन्हावर निवड लढवली

4. सुरेश धस- तिसर्‍यांदा आमदार – आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्यांचं प्रतिनिधित्व – अजित पवार यांचे कट्टर समर्थक- महानंदचे माजी चेअरमन

5. उदय सामंत – रत्नागिरीचे आमदार – दुसर्‍यांदा आमदार 6. संजय सावकारे – भुसावळ- आमदार संतोष चौधरींचे पीए- मतदार संघ आरक्षणामुळे उमेदवारी

बार्शीकरांचा जल्लोषराज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी दिलीप सोपल यांची निवड झाल्याबद्दल बार्शी शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पहिल्यांदाच बार्शीला कॅबिनेट दर्जाचा मंत्री मिळाल्यामुळे शहरात उत्साहचं वातावरण आहे. 5 वेळा विविध चिन्हावर निवडून आलेल्या दिलीप सोपल हे अजित पवार आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. या निवडीने बार्शीत जल्लोष साजरा होतोय.

close