जळगावात केळ्यांची होळी

January 10, 2009 7:01 AM0 commentsViews: 1

10 जानेवारी, जळगाववाहतूकदारांनी पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. या संपामुळं जळगाव जिल्ह्यातल्या शेतक-यांवर मोठं संकट कोसळलंय. आपल्याच शेतातल्या केळीला नष्ट करण्याची वेळ त्यांच्यावर आली. रावेरच्या केळी उत्पादक शेतक-यांनी तयार मालाला बाजारपेठ असूनही विकता येत नसल्यानं भर रस्त्यावर केळीची होळी केली. जळगावातून रोज होणारी अडीच ते तीन हजार टन केळीची वाहतूक थांबली. आता या नाशवंत पीकाचं काय करायचं हा यक्ष प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिलाय. अखेर वाहतूकदार आणि सरकार या दोघांचाही निषेध करत या शेतक-यांनी आपली खराब झालेली केळी जाळून टाकली.शेतक-यांना वेठिस धरणा-या या संपाचं नाटक त्वरीत बंद करावं नाहीतर शेतक-यांना रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा या शेतक-यांनी दिलांय. तसंच शेतकर्‍यांच्या या अवस्थेबद्दल त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना जबाबदार धरलंय.एवढ्या कष्टानं वाढवलेल्या केळीला जाळतांना या शेतक-यांना होणार्‍या वेदनांचा विचार व्हायला हवा. इतरांसारखा शेतक-यांना संप करता येत नाही म्हणूनच मग अशा नकारात्मक परिस्थितीत शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसतो.

close