राजू यांची कोर्टात हजेरी

January 10, 2009 7:04 AM0 commentsViews: 7

10 जानेवारी, हैदराबादसत्यम महाघोटाळ्याचे सूत्रधार रामलिंग राजू यांनी अखेर काल मध्यरात्री पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्यांच्यासोबत त्यांच्या भावानंही शऱणागती पत्करलीय. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. तत्पुर्वी केंद्र सरकारने सत्यम कंपनीचं संचालक मंडळ बरखास्त केलं.संपूर्ण देशाला मोठा धक्का देणार्‍या आणि सात हजार कोटींची फसवणूक करणार्‍या सत्यमचे माजी अध्यक्ष रामलिंग राजू यांना काल अखेर अटक झाली. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ राम राजू यालाही अटक झाली आहे. त्यांच्यावर भारतीय पीनल कोडच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 120 B अंतर्गत त्याच्यांवर गुन्हेगारी कट रचण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.कलम 420 खाली फसवणूक ीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर कलम 468 खाली फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय .शिवाय कलम 471 अतंर्गत बनावट कागदपत्र तयार करण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे आरोप सिध्द झाल्यास त्यांना 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. हे सर्व गुन्हे अजामीनापत्र आहेत त्यामुळंे या दोघांनाही काही वेळ तुरुंगात घालावावाच लागणार आहे.सत्यम कंपनीचे चीफ फायनान्स ऑफिसर वालदामनी श्रीनिवास यांनाही अटक होणार असल्याचं पोलिसांनी म्हंटलय. या प्रकरणाची चौकशी तीन एजन्सीजकडून करण्यात येणाराय. त्यापैकी सेबीच पथक हैदराबाद इथ पोहोचल असून ते आज 4 वाजता चौक शीला सुरुवात करणार आहे. तर सीआयडीची चौकशी सुरू आहे. रजीस्टर ऑफ कंपनीच्या पथकानही चौकश्ीला सुरुवात केली आहे.

close