नवी मुंबईत ‘अर्बन हट’ प्रोजेक्ट

January 10, 2009 7:11 AM0 commentsViews: 3

10 जानेवारी, मुंबईविनय म्हात्रेनवी मुंबईच्या विकासात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय. भव्य रेल्वे स्थानक, पामबीच रोड, आयटी पार्क हे आतापर्यंत नवी मुंबईचं भूषण होतं. पण आता सिडकोनं अर्बन हट उभारायला सुरुवात केलीय. निसर्गाच्या सानिध्यात उभारण्यात आलेला अर्बन हट हा राज्यातील पहिलाच प्रोजेक्ट आहे. सिडकोनं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या मदतीनं हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे.हॅन्डीक्राफ्ट आणि त्यांच्या उत्पादनासाठी कायमस्वरुपी बाजारपेठ मिळावी, हा या प्रकल्पाचा त्यामागचा उद्देश आहे. बाजारपेठेत पन्नास दुकानं उभारण्यात आली आहेत. दर पंधरा दिवसांनी देशातील विविध राज्यातील अपंग याठिकाणी येवून आपल्या मालाची विक्री करणार आहे. "विक्री बरोबर पर्यटन स्थळ म्हणूनही हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. फूड स्टॉल गार्डन कारंजे निसर्गाच्या सानिध्यात राहून याचा उपभोग ख्यावा हे सिडकोच उद्दिष्ट आहे." असं सिडकोचे वास्तुशास्त्रज्ञ दिलीप शेकदार यांनी सांगितलं.दुकानांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, रस्ते, गार्डन, कारंजे, हे सारं इथं आहे, इतकंच काय ओपन एअर थिएटरही आहे. आणि हे सारं बांधलंय निसर्गावर कोणतही अतिक्रमण न करता. नवी मुंबईतीलं पहिलं पर्यटन स्थळ म्हणून या अर्बन हटची ओळख असणार आहे. इथल्या प्रत्येक झाडांच जतन करण्यात आलंय. बांबूच बन, वेली, या सगळ्यामुळे नवी मुंबईच्या काँक्रीटच्या जंगला आहोत की खर्‍याखुर्‍या अशी शंका येते.गेले बारा महिने या अर्बन हटच काम चालू आहे. 23 जानेवारीला त्याचं उद्घाटन होणार आहे. या नव्या पर्यटनस्थळाला भेट देण्यास नवी मुंबईचे नागरिक नक्कीच उत्सुक आहेत.

close