डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीने कायदा करण्याची गरज आहे का? (भाग: 1)

February 11, 2009 7:48 AM0 commentsViews: 12

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीने कायदा करण्याची गरज आहे का? (भाग: 1)केईएममध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यास वेळ लागल्यामुळे मृतदेह देण्यास विलंब झाला. याकारणामुळे मृत व्यक्तींचे नातेवाईक संतापले. 20 ते 25 जणांनी निवासी डॉक्टरांच्या खोलीत शिरून सुरक्षारक्षकासमोर डॉक्टरांना मारहाण केली. या मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून केईएममधले निवासी डॉक्टर रात्रीपासून संपावर गेले. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. या घटनेवरचं होता आपला आजचा सवाल डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीने कायदा करण्याची गरज आहे का?यावेळच्या चर्चेत भाग घेतला महाराष्ट्राचे आरोग्य सचिव भूषण गगराणी, रुग्णहक्क चळवळीचे आग्रही कार्यकर्ते आणि पत्रकार प्रमोद मुजुमदार, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे चेअरमन डॉ. सतिश देसाई, केईएमचे निवासी डॉक्टर डॉ. अभिषेक पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विलास साळगावकर यांनी.डॉ. सतिश देसाई म्हणाले रुग्णांचे नातेवाईक असे का करतात याकडे डॉक्टरांनी पाहिले पाहिजे. तसंच अनेक राज्यांनी डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कायदे केले आहेत. पण महाराष्ट्रात अजून असा कायदा नाही. त्याचबरोबर सगळ्याच डॉक्टरांना एकच न्याय देणं योग्य नाही. केईएमचे निवासी डॉक्टर डॉ. अभिषेक पाटील सांगतात, केईएममध्ये अनेक ठिकाणहून रुग्ण येतात. अनेक तास काम केल्यानंतर त्याच्याकडे काम आलं तर त्यांची मनोवृत्ती नक्कीच ढळलेली असते. अशावेळी पेशंटने डॉक्टरांची परिस्थिती पाहिली पाहिजे. पत्रकार प्रमोद मुजुमदार डॉक्टरांवरील हल्ले समर्थनीय असूच शकत नाही.रुग्ण संतप्त प्रतिक्रिया का देतात त्याच्या या मनोवृत्तीकडे पाहिलं पाहिजे.महाराष्ट्राचे आरोग्य सचिव भूषण गगराणी आता येत्या अधिवेशनात, डॉक्टरांवरील हल्ला हा नॉन बेलेबल गुन्हा ठरणार असा कायदा केला जाणार आहे अशी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते विलास साळगांवकर सांगतात, सद्या रुग्णांना योग्य ट्रिटमेंट मिळत नाही. पोस्ट मॉर्टमला इतका वेळ का लागतो. वेळ काढू भूमिकेमुळेच लोकांमधील उद्रेक वाढतो आहे. आणि अशा घटना घडतात. शेवटी आयबीएन लोकमतचे न्यूज एडिटर सुभाष शिर्के म्हणाले की, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदे करावेत का यांचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. डॉक्टर आणि पेशंट यांनी आपापली जबाबदारी समजून काम केलं तर अशा घटना घडणार नाही. तसंच 64 टक्के लोकांना वाटतं डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीने कायदा करण्याची गरज आहे.

close