महेंद्र कपूर ‘लता मंगेशकर’ पुरस्काराचे मानकरी

January 10, 2009 7:16 AM0 commentsViews: 6

10 जानेवारी, मुंबईमहाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्काराचं शुक्रवारी वितरण करण्यात आलं. 2008 च्या या पुरस्काराचे मानकरी ठरले ज्येष्ठ गायक महेंद्र कपूर. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती दीपलता कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी जगजीत सिंग, शान या सारख्या अनेक दिग्गजांनी आपल्या गाण्यांद्वारे महेंद्र कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

close