गजनीचं मोबाईल मार्केटिंग

January 10, 2009 7:18 AM0 commentsViews: 3

10 जानेवारी, मुंबईगजनी रिलीज झाल्यानंतर एवढे दिवस होऊनही सिनेमाची क्रेझ काही कमी होत नाहीये.. सिनेमानंतर गजनीचे कॉम्प्युटर गेम्स तर आपण पाहिले पण आता गजनीचे मोबाईल गेम्सही लाँच झाले आहेत.आमीर खानने गजनी तर एकदम सुपरहिट करुन दाखवला, पण आता तुम्हीसुध्दा आमीरची जागा घेऊन यश मिळवू शकता अर्थात गजनी मोबाईल गेममध्ये. आणि यासाठी तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत चार मोबाईल गेम्सचे. यात हार्डकोअर ऍक्शन असलेले गेमही आहेत आणि अगदी साधे ब्रेन टीझरही. पण ज्यांना यापेक्षा जास्त थ्रिल हवंय त्यांच्यासाठी आहे 'गजनी अल्टीमेट वर्कआऊट ऍप्लिकेशन.'"आम्हाला पाच गेम्स बनवायचे होते, त्यामुळे स्क्रीप्टचा आम्ही अभ्यास केला..यात लव्ह अँगल आहे,मेमरी अँगल आहे, ऍक्शन अँगल आहे, मग त्याप्रमाणे आम्ही गेम्स डेव्हलप केले." असं इंडियागेम्स डॉट कॉमचे गेम डेव्हलपर शाईना राजन यांनी सांगितलं.हे गेम्स डेव्हलप करायला आमीरनेही टिप्स दिल्यात. नव्व्याण्णव रुपयांत तुम्ही हे गेम्स डाऊनलोड करु शकता. अर्थात गजनीच्या फॅन्समध्ये हे गेम्सही लोकप्रिय होणार, यात शंका नाही.

close