वसंतदादा सहकारी बँकेचा परवाना रद्द

January 10, 2009 7:32 AM0 commentsViews: 1

10 जानेवारी, सांगलीसांगली इथल्या वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा आदेश रिझर्व बँकेन दिला आहे. या संबधीच पत्रच शुक्रवारी बॅँकेच्या संचालक मंडळाला मिळाला आहे. त्यामुळे ठेवीदार आणि कर्मचार्‍यांमध्ये गोधंळाचं आणि घबराटीच वातावरण निर्माण झालं आहे. नियमांना डावलून कर्जाचं वाटप केल्यामुळं यापुर्वीच 25 जुलै रोजी रिझर्व बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध घातले होते. या आदेशामुळं या बँकेच अस्तीत्वच धोक्यात आलं असून आता या बँकेचे व्यवहार पतसंस्था किंवा सोसायटीप्रमाणे करावे लागणार आहे. कारण या बँकेचा रिझर्व बँकेशी कोणताही संबध राहणार नाही. या बँकेत सुमारे 300 कोटी रुपयांच्या ठेवी जमा असून 320 कोटींची कर्ज थकीत आहे. या बॅकेच्या एकुण 33 शाखा आहेत.सहकार कायदा 88 अतर्गतही या बँकेची चौकशी सुरू आहे.

close